⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

भाजपच्या नवीन संसदीय मंडळाची घोषणा ; फडणवीस इन, गडकरी आऊट

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२२ । भारतीय जनता पक्षाच्या नवीन संसदीय मंडळाची घोषणा केली आहे. यात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadakari) यांना वगळण्यात आले आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात भाजपला सत्तेत आणून दाखवल्यामुळे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांचे दिल्लीमध्ये वजन वाढले आहे. त्यामुळे त्यांचे संसदीय मंडळात समावेश करण्यात आला आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी ही यादी जाहीर केली आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाची स्थापना केली आहे. यात नव्या चेहऱ्यांचा समावेश केला आहे. त्यात जेपी नड्डा अध्यक्ष असतील तर इतर सदस्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, के लक्ष्मण, इक्वाल सिंग लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण यांचा समावेश आहे. जाटिया आणि बी.एल.संतोष. बीएल संतोष केंद्रीय संसदीय मंडळाचे सचिव असतील.

तसेच या यादीत देवेंद्र फडणवीस यांचंही नाव आलं आहे. भाजपने आता फडणवीस यांच्यावर एकाप्रकारे मोठी जबाबदारी सोपवली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही सर्वात मोठी घडामोड आहे. दिल्लीमध्ये आता फडणवीस यांचा दबदबा आणखी वाढला आहे. मात्र दुसरीकडे नितीन गडकरी यांचं नाव वगळण्यात आले आहे. तसेच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची नाव वगळण्यात आलं आहे.