⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

काही जणांना मंत्री पद मिळणार होते, पण.. ना.गुलाबराव पाटलांचं स्पष्टीकरण

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२३ । अजित पवार (Ajit Pawar) गटाचे (राष्ट्रवादी) नवनिर्वाचित मंत्री अनिल भाईदास पाटील (Anil Patil) मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यात आगमन झाले. आज सकाळी त्यांचं रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत झाल्यानंतर ते आपल्या अमळनेर (Amaler) तालुका या मतदारसंघाकडे मार्गस्थ झाले. यादरम्यान मार्गात त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी येथील निवासस्थानी जाऊन गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांची भेट घेत आशीर्वाद घेतले.

यावेळी ना. गुलाबराव पाटील आमदारांमध्ये नाराज असल्याच्या विषयावर बोलले.’थोडी फार नाराजी तर राहणार आहे. काही जणांना मंत्री पद मिळणार होते, मात्र अचानक आता तिसरा वाटेकरी आल्यामुळे नाराजी आहे. मात्र एकनाथ शिंदे साहेबांनी ती दूर केल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

ठाकरे गटात पुन्हा जाण्यासंदर्भात “सांगेल तुम्हाला मी तसं… पण तसं तर काही नाहीये अशा प्रकारचं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केले आहे. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समवेत संजय पवार यांची उपस्थिती होती. याठिकाणी अनिल भाईदास पाटील यांचे औक्षण करण्यात आले, तसेच त्यांना पेढा भरवून तोंड गोड करण्यात आले. यावेळी गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी ते काम करतील, अशा शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत. त्यांनी भगवे विचार स्वीकारले आहेत, त्यांनी शिवसेना भाजप सोबत येण्याचा विचार केला. त्यामुळे त्यांचं भगवी शाल पांघरुन स्वागत केलं. भगवी शाल केवळ शिवसेनेची नाही, भगवा हा त्याचंच प्रतीक आहे, असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.