---Advertisement---
जळगाव जिल्हा

ना.गुलाबराव पाटील यांचा खंदा समर्थक हरपला; आरोग्यदूत अनिल महाजनांचे निधन..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील अतिशय शांत व संयमी असलेले तसेच ना. गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे संपूर्ण काम पाहणारे, जीपीएस मित्रपरिवाराचे सर्वेसर्वा अनिल आत्माराम महाजन यांचा दुर्धर व्याधीने मृत्यू झाला असून या घटनेने संपूर्ण पाळधी परिसरामध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.

anil mahajan

त्यांच्या निवासस्थानी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी गर्दी केली आहे. सर्वसाधारण परिस्थिती असलेले अनिल महाजन हे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांचे अत्यंत जवळचे मोठ्या भावाप्रमाणे मित्र होते. मंत्री गुलाबराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी त्यांना शारीरिक त्रास जाणवू लागला. त्यानंतर प्रतापराव पाटील यांनी त्यांना तत्काळ जळगाव येथील दवाखान्यात दाखल केले.

---Advertisement---

त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तात्काळ मुंबई येथे रवाना होण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना मुंबई येथे नेण्यात आले. मंत्री गुलाबराव पाटील यांचया माध्यमातून संपूर्ण व्यवस्था करण्यात आली. मात्र त्यांचा रक्तात ब्लड कॅन्सर आढळला. अनिल महाजन यांनी धास्ती घेतली. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. परिवारासह मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ दोन मुलं असा परिवार आहे .दरम्यान अनिल भाऊंच्या निधनामुळे आजची प्रचार रॅली बंद ठेवण्यात आली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---