⁠ 
मंगळवार, डिसेंबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | बाबा.. रावेर-यावलच्या जनतेला गुलामगिरीतून मुक्त होऊ द्या! अनिल चौधरी साई बाबा चरणी लीन

बाबा.. रावेर-यावलच्या जनतेला गुलामगिरीतून मुक्त होऊ द्या! अनिल चौधरी साई बाबा चरणी लीन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विजयासाठी साकडे, प्रचाराला सुरुवात

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ नोव्हेंबर २०२४ । बाबा.. रावेर-यावलच्या जनतेला गुलामगिरीतून मुक्त होऊ द्या, माझ्या विजयाने मतदार संघाचा सर्वांगीण विकास होऊ द्या. जाती-पातीच्या भिंती गळून जनतेला सुख, शांती, समृद्धीचे दिवस येऊ द्या, असे साकडे रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन महाशक्ती प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांनी साईबाबांना घातले.

रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन महाशक्ती प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्री तीर्थक्षेत्र साईबाबा मंदिर वनोली ता.यावल येथे करण्यात आला. मंदिराच्या पवित्र परिसरात, परिवर्तन महाशक्तीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी मांदियाळी जमली होती. माझ्या विजयासह जनतेला सुगीचे दिवस येऊ दे. परंपरागत कौटुंबिक वारसा दूर करून एक मजुराच्या मुलाच्या हातून जनतेची सेवा घडू दे असे साकडे अनिल चौधरी यांनी साईबाबांना घातले असून जनतेच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने प्रचंड मताधिक्याने माझा विजय होणार असल्याचा विश्वास परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार अनिल चौधरी यांनी व्यक्त केला.

प्रसंगी फिरोज शेख, गणेश बोरसे, राम कुकडे, गोकुळ कोळी, कल्पेश खात्री खत्री, करीम मन्यार, भरत लिधुरे, विलास पांडे, बिलाल शेख, तुकाराम बारी, नंदकिशोर सोनवणे यांच्यासह अनेक जेष्ठ मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यकर्त्यांनी उत्साहात अनिल चौधरी यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी अनिलभाऊ तुम आगे बढो, अनिलभाऊंचा विजय असो, अशा घोषणांनी परिसर कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला.

पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मांदियाळी
प्रचारात विकास पाटील, खेमचंद कोळी, सचिन झाल्टे, लतीफ खान, शुभम पाटील, सागर चौधरी, मनोज करंकाळ, दिलीप बंजारा, विनोद कोळी, अनिल चौधरी, अय्युब पहेलवान, मोहसीन शेख, विजय मिस्तरी, रवी महाजन, हाजी हकीम सेठ, राकेश भंगाळे, अनंत जोशी, बंटी मंडवाले, विक्की काकडे, सचिन कोळी, रमजान तडवी, रोनक तडवी, सुधाकर भिल्ल, सचिन महाजन, संतोष चौधरी, चेतन वायकोळे, गोलू मानकर यांच्यासह रावेर व यावल तालुक्यातील पदाधिकारी व परिवर्तन महाशक्तीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.