भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरींना अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर

मे 27, 2021 11:04 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२१ । भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांना सर्वोच्च न्यायालयाने पंधरवड्यासाठी अंतरीम अटकपूर्व जामीन 25 मे रोजी मंजूर केल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. भुसावळ येथील एका महिलेकडून 60 लाख 70 हजार रुपये घेऊन गाळे खरेदी करून न देता फसवणूक केल्याचा चौधरींवर आरोप असून या संदर्भात भुसावळातील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा (30/21) दाखल आहे.

anil chaudhar

सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर

गाळे खरेदी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल चौधरी यांनी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला मात्र तो फेटाळण्यात आल्यानंतर खंडपीठात दाद मागण्यात आली होती मात्र तेथे दिलासा न मिळाल्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. त्यावेळी फसवणूक झालेल्या प्रकरणात आधी भुसावळातील दिवाणी न्यायालयात 60 लाख 70 हजार रुपये जमा करावी व त्यानंतर म्हणणे ऐकले जाईल, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर रक्कम भरण्यात आली होती व पैसे भरण्यात आल्याचे कागदपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आले. त्यानंतर अंतरीम जामीन अर्जावर सुनावणी होवून दोन आठवड्यांसाठी अंतरीम जामीन मंजूर करण्यात आला व पोलिसांनी आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयातील न्या.सर्वश्री दिनेश माहेश्‍वरी व न्या.अनिरुद्ध बोस यांनी दिले आहेत. या प्रकरणात आता सुनावणी दोन आठवड्यानंतर होणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now