प्रवाशांना दिलासा! भुसावळमार्गे गोरखपूर आणि दानापूरसाठी धावणार अनारक्षित रेल्वे गाडी
जळगाव लाईव्ह न्यूज । दिवाळी सणासाठी अनेक जण कुटुंबासह गावी जातात. मात्र यादरम्यान रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई-गोरखपूर आणि पुणे- दानापूरदरम्यान अतिरिक्त अनारक्षित विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. क्र. ०१०१९ अनारक्षित विशेष दि. २८ ऑक्टोबर रोजी मुंबई येथून १४:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी गोरखपूर येथे २३:०० वाजता पोहोचेल. क्र. ०१०२० ही गाडी ३० ऑक्टोबर रोजी गोरखपूर येथून ००:४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मुंबई येथे १०:३५ वाजता पोहोचेल.
या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाल, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन, ओराई, कानपूर, लखनौ, बाराबंकी, गोंडा आणि बस्ती इथे थांबे असतील.
क्र. ०१४१९ अनारक्षित विशेष २८ ऑक्टोबर रोजी पुणे येथून १०:५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दानापूर येथे २१:३० वाजता पोहोचेल. तसेच क्र. ०१४२० अनारक्षित विशेष २९ ऑक्टोबर रोजी दानापूर येथून २३:५० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पुणे येथे ०९:५५ वाजता पोहोचेल.
या गाडीला दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा येथे थांबे असतील.