दुर्धर आजाराने कंटाळून न्हावीतील वृद्धाची आत्महत्या

ऑक्टोबर 18, 2022 12:31 PM

Yawal newa-जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२२ । यावल तालुक्यातील न्हावी गावातील 64 वर्षीय वृद्धाने आजाराला कंटाळुन आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी दुपारी उघडकीस आला. याप्रकरणी फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

jalgaon jpg webp

जयंत काशीराम फिरके (64) असे मयताचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून फिरके हे दुर्धर आजाराने त्रस्त होते व सोमवारी ते घरी एकटेच असताना त्यांनी गळफास घेतला. हा प्रकार दुपारी दोन वाजेच्या सुमारास निदर्शनास आल्यानंतर तातडीने फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली. मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये नेल्यानंतर डॉ.सचिन देशमुख यांनी शवविच्छेदन केले. या प्रकरणी फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात वडील, पत्नी, मुली असा परीवार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now