---Advertisement---
जळगाव जिल्हा महाराष्ट्र

लोखंडी पाईप ट्रकच्या कॅबीनमध्ये घुसले ; ट्रक चालकाचा जागीच मृत्यू !

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुने २०२३ । औरंगाबाद – धुळे महामार्गावर लोखंडी पाईप असलेल्या ट्रकला समोरून येणार्‍या भरधाव ट्रकने धडक दिली. यावेळी झालेल्या भीषण अपघातात ट्रकमधील लोखंडी पाईप ट्रकच्या कॅबीनमध्ये घुसून त्याखाली दाबल्या गेल्याने ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास भीषण अपघातात झाला.

accidnt jpg webp webp

संतोषकुमार हा जिंदाल कंपनीचे जवळपास 150 लोखंडी पाईप ट्रकमध्ये भरून संभाजीनगरकडून धुळ्याकडे जात होता. त्याच्यासमवेत अन्य दोघे जण होते. लोखंडी पाईप भरलेला हा ट्रक घाट उतरत असतांना घाटातील मेणबत्ती पॉईंटजवळ समोरून येणार्‍या भरधाव ट्रकने त्याला धडक दिली. समोरासमोर जबर धडक बसल्याने ट्रकमधील लोखंडी पाईप कॅबीनमध्ये घुसल्याने त्यात दाबला जावून संतोष पांढरे याचा जागीच मृत्यू झाला तर या पाईपांमध्ये ट्रकमधील अन्य दोघे जण अडकले होते. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्राचे उपनिरीक्षक भागवत पाटील, हवालदार विरेंंद्र शिसोदे यांच्यासह चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे नंदू परदेशी, राहूल जाधव यांनी धाव घेत महामार्गच्या क्रेनद्वारे या जखमींना ट्रकमधून बाहेर काढून रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

---Advertisement---

पोलीस अपघातस्थळी पोहोचले तेव्हा दोघे लोखंडी पाईपाखाली दाबले गेल्याचे दिसून आले तर काही पाईप रस्त्यावर विखूरले होते. पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून अडकलेल्या या दोघांना वाचविले. मदतकार्यास थोडाही उशीर झाला असता तर या दोघांच्या जीवावर बेतले असते. दोघांचा जीव वाचल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे. या थरकाप उडवणार्‍या अपघातामुळे घाटातील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---