जळगाव शहरातील पाणीपुरवठ्याबाबत एक महत्वाची

जानेवारी 7, 2025 10:32 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२५ । जळगाव शहरातील पाणीपुरवठ्याबाबत एक महत्वाची बातमीचे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या उमाळा येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरूस्तीचे काम मनपाने हाती घेतल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला. आज मंगळवारी होणारा पाणीपुरवठा आता बुधवारी होणार असून ८ जानेवारीचा नियोजित पाणीपुरवठा एक दिवस उशिराने होईल अशी माहिती मनपाने दिली आहे.

manapa nal jpg webp

गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील पाणीपुरवठयात विविध कारणाने व्यत्यय येतो आहे. आतापर्यंत आठ ते दहा वेळा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला. आता उमाळा जलशुद्धीकरण केंद्र दुरूस्तीच्या कामामुळे एक दिक्स पाणीपुरवठा पुढे ढकलण्यात आला आहे. नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा साठा काळजीपूर्वक वापरावा असे आवाहन मनपाच्या पाणीपुरवठा विभागातर्फे सोमवारी करण्यात आले.

बुधवारी या भागात होणार पाणीपुरवठा
शहरात ८ जानेवारी रोजी नटराज टाकी ते चौघुले मुळापर्यंत भाग, शनिपेठ, बळीराम पेठ, नवीपेठ, हौसिंग सोसायटी, प्रतापनगर, शाहुनगर, खडकेचाळ, इंद्रप्रस्थनगर, के. सी. पार्क, गेंदालाल मिल हुडको, भोईटेनगर, भिकमचंद जैन नगर, जुनेगाव, सिंधी कॉलनी, इंडिया गॅरेज, ओंकारनगर, जोशीपेठ, गणेशवाडी, कासमवाडी, सम्राट कॉलनी, ईश्वर कॉलनी, वर्षा कॉलनी, सुप्रीम कॉलनी परिसर, साने गुरूजी कॉलनी, पार्वतीनगर, शिवरामनगर, यशवंतनगर, श्रद्धा कॉलनी, नंदनवन नगर, चर्च रोड, प्रभात कॉलनी, ब्रुकब्रॉण्ड कॉलनी, वाघनगर, हरिविठठलनगर, गणेश कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी परिसर, समता नगर, स्टेट बैंक कॉलनी, घांडेनगर, इकबाल कॉलनी, मिल्लतनगरसह आदी भागात पाणीपुरवठा होणार आहे असे मनपाने सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now