---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

Jalgaon : फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला दोघांनी लुटले, गुन्हा दाखल

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात आधीच चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून यातच आता जबरी चोरीच्या घटना वाढताना दिसत आहे. अशातच नेरी येथील पेट्रोल पंपाजवळ कर्ज वसुलीसाठी दुचाकीने जाणाऱ्या खासगी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला संशयित दुचाकीस्वारांनी अडवले. त्याच्याकडून २५ हजाराची रक्कम, दुचाकी व मोबाइल हिसकावून घेत मारहाण केली.

crime 2 jpg webp webp

फिर्यादी अमोल शेकन्ना मेकला (२६, रा. शिव कॉलनी, जळगाव) हे देवपिंप्री व पहूर येथे कर्जाच्या हप्त्याची रक्कम वसूल करण्यासाठी व कर्जाची रक्कम वाटपासाठी जळगाव येथून सकाळी ६ वाजता निघाले. सकाळी ७ वाजेच्या सुमारास नेरी येथून पुढे जात असताना पेट्रोल पंपाजवळ समोरून दुचाकीवर तोंडाला कापड बांधून आलेल्या दोघांनी त्यांना अडवले.

---Advertisement---

त्यातील एकाने मेकला यांचे हात पकडले व दुस-याने त्यांच्या खिशातील २५ हजार व मोबाईल काढून घेतला. दोघांपैकी एकाने मेकला यांच्या दुचाकीवर बसून पळ काढला व दुसरा त्याने आणलेल्या दुचाकीवरून पळून गेला. घाबरलेल्या अवस्थेतील अमोल मेकला यांनी चालत देवपिंप्री गाठले व फायनान्स कंपनीच्या वरिष्ठांना माहिती दिली. मेकला यांच्याकडील २५ हजार रोख, ३० हजारांची दुचाकी व ५ हजाराचा मोबाईल असा ६० हजाराचा ऐवज लांबविल्याप्रकरणी अनोळखी दोन इसमांविरुद्ध जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---