दुचाकी घसरून अपघात, नायगावचे वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२२ । नायगाव येथील वृद्ध दाम्पत्यची दुचाकी घसरून अपघात घडला. यात दांपत्य गंभीर जखमी झाले. यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांना जळगावला हलवण्यात आले.

accident 17 jpg webp

यावल तालुक्यातील नायगाव येथील माधवराव फकिरा पवार (वय ७०) आणि इंदुबाई माधव पवार (वय ६८) हे वृध्द दांपत्य दुचाकीने सोमवारी दुपारी तीन वाजता नायगाव येथून भुसावळ जाण्यासाठी निघाले होते. अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य मार्गावर साकळी गावाजवळ त्यांची दुचाकी घसरून अपघात घडला. त्यात पती-पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी. बी.बारेला, डॉ.अमीन तडवी, अधिपरिचारिका मंजूषा कोळेकर, संजय जेधे आदींनी प्रथमोपचार केले. दोघांना चेहऱ्याला व डोक्यावर जबर दुखापत असल्याने पुढील उपचारार्थ जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now