जळगावात गटारीत आढळला प्रौढाचा मृतदेह, पोलिसांची धाव

नोव्हेंबर 28, 2021 1:20 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२१ । येथील असोदा रस्त्यावर वाल्मीक नगराजवळ लेंडीनालालगत गटारीत एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

Crime 6 jpg webp

येथील वाल्मीक नगरातील लेंडीनाला पुलाच्या जवळ गटारीत रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

शनीपेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत मृतदेह बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात रवाना केला. मयताची अद्याप ओळख पटलेली नसून तो याच परिसरात नेहमी फिरत असल्याची माहिती मिळाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now