तापी नदी पात्रात पाय घसरून बुडाल्याने मोहाडीच्या प्रौढाचा मृत्यू

ऑक्टोबर 12, 2022 8:06 PM

Yawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२२ । यावल तालुक्यातील कोळन्हावी जवळील तापी नदीच्या पात्रात पाय घसरून खोल पाण्यात बुडाल्याने मोहाडी येथील प्रौढाचा नुकताच मृत्यू झाला. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

jalgaon 2022 10 12T200529.551 jpg webp

मनोज मधुकर सपकाळे (मोहाडी, ता. जळगाव) असे मयताचे नाव आहे. कोळन्हावी, ता.यावल या गावाजवळ तापी नदीचे पात्र असून या तापी नदीच्या पात्रात मनोज मधुकर सपकाळे (45, रा.मोहाडी, ता. जळगाव) हा इसम मूर्तीविसर्जनकरीता आल्यानंतर पाय घसरून नदीपात्रात बुडाला होता. नागरीकांनी नदीपात्रातून त्यास बाहेर काढत जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले. जळगाव जिल्हा रुग्णालयाच्या डॉ.रेणुका भंगाळे यांनी यावल पोलिसात दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now