जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२२ । रावेर तालुक्यातील कुसुंबा येथे १८ वर्षीय तरूणीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पूजा रविंद्र तायडे (वय १८) रा. कुसुंबा ता. रावेर असे मृत तरूणीचे नाव आहे. पूजा तायडे ही तरूणी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होती. तिने आज म्हणजे बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घरातील बाथरूमध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण समजू शकले नाही. तातडीने तिला रावेर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. तरूणीचे वडील रविंद्र मधुकर तायडे यांनी दिलेल्या खबरीवरुन रावेर पोलिस ठाण्यात अकास्मत मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरिक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शना खाली उपनिरिक्षक दिपाली पाटील पोहेका सतीष सानप तपास करीत आहेत.