⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | राष्ट्रीय | अमृत महोत्सव लेखनमाला : बलिदानाच्या आधी प्रथम मातृभूमीला वंदन; बिस्मिल, अशफाक, लाहिडी, रोशन सिंह यांनी पत्करले हौतात्म्य

अमृत महोत्सव लेखनमाला : बलिदानाच्या आधी प्रथम मातृभूमीला वंदन; बिस्मिल, अशफाक, लाहिडी, रोशन सिंह यांनी पत्करले हौतात्म्य

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सशक्त क्रांतीची सुवर्णांकित पाने भाग- ११

पहिल्या महायुद्धात विजय मिळवल्यानंतर इंग्लंडची साम्राज्यवादी लालसा वाढली. इकडे भारतात क्रांतिकारकांद्वारे केले जाणारे सशस्त्र आंदोलन ‘गदर’ सुद्धा आपल्याच काही मूठभर गद्दार लोकांमुळे अयशस्वी झाले. या ‘गदर’ मध्ये सहभाग घेणाऱ्या क्रांतिकारकांना तसेच समर्थकांना सरकारने शोधून शोधून त्यांचा बंदोबस्त केला. शेकडो क्रांतिकारकांना फाशी झाली, मोठ्या काळासाठी अटक करून सशस्त्र क्रांतीच्या या प्रयत्नाला आळा घातला. आपल्या विजयाच्या अहंकारात बुडालेल्या विदेशी राज्यकर्त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या भारतीयांना विशेष करून क्रांतिकारक युवकांची शक्ती पूर्णपणे संपवण्यासाठी अनेक बेकायदेशिर क्लृप्त्या वापरल्या. काही काळासाठी भारतमातेच्या गळ्यात पडलेले गुलामगिरीचे साखळदंड अधिक मजबूत झाले.

आतापर्यंत क्रांतिकारकांचे प्रेरणा असणाऱ्या लोकमान्य टिळकांनंतर भारतीय राजकारणात महात्मा गांधींचे वर्चस्व आल्याने अहिंसावादी राजनीतीचा प्रभाव वाढला. गांधीजींनी देशातील लोकांना “एक वर्षात स्वराज्य” मिळवून देण्याच्या विश्वासासोबत सर्वांनी सत्याग्रहाचा मार्ग निवडला. महात्मा गांधींचे एका वर्षात स्वराज्याचे स्वप्न साकार झाले नाही परंतु सशस्त्र क्रांतिकारकांचा हा विश्वास प्रबळ झाला की एवढ्या मोठ्या शक्तिशाली साम्राज्याशी टक्कर घेण्यासाठी याचना करणाऱ्या सत्याग्रहाची नाही तर सशस्त्र संग्रमाचीच आवश्यकता आहे.

शेवटी क्रांतिकारी पुन्हा एकत्र येऊन आधीपेक्षा जास्त ताकतीने इंग्रजांवर हल्ला करण्याच्या राजनीतीचा विचार केला. सच्चींद्रनाथ सन्याल आणि योगेश चंद्र या दोन जुन्या क्रांतिकारकांनी ” हिंदुस्तान गणतंत्र सेना” ची स्थापना करून क्रांतिकारकांना एका मंचावर आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला. या दोघांच्या कार्याचे फळ म्हणजेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करणाऱ्या अनेक लहान मोठ्या संस्थांनी मिळून हिंदुस्थान गणतंत्र सेनेसोबत काम करण्याचे ठरवले.

सच्चींद्रनाथ सन्याल यांनी आता हिंदुस्तान प्रजातंत्र सेनेचे नवीन संविधान तयार करून घोषणा केली. – ” ब्रिटिश शासकांना मुळापासून उपटून अश्या स्वदेशी सरकारची स्थापना करणे ज्यात जनतेचे हक्क सुरक्षित असतील.” लवकरच अनेक भागांमध्ये या क्रांतिकारी दलाचे काम उभे राहिले. प्रसिद्ध क्रांतिकारी पंडित राम प्रसाद बिस्मिल यांना उत्तर प्रदेशाचे कमांडर बनवले गेले. याच प्रकारची व्यवस्था बाकीच्या राज्यांमध्ये सुद्धा करण्यात आली.

जानेवारी 1925 या नवीन क्रांतिकारक दलाचे नेता सच्चींद्रनाथ सन्याल यांनी एक विस्तृत घोषणा पत्र “क्रांतिकारी” तयार करून देशभरात कार्यरत असलेल्या क्रांतिकारकांना पाठवून दिले. सच्चींद्रनाथ लाहोरच्या नॅशनल कॉलेज चे एक प्रोफेसर जयचंद्र अर्थात क्रांतिकारी भगवती चरण यांनी या घोषणा पत्राच्या प्रचार – प्रसारा साठी अथक परिश्रम केले.1915 च्या गदर च्या अपयशानंतर इंग्रज सरकारला असे वाटले की हे आंदोलन पूर्ण पणे साफ झाले आहे. परंतु ” क्रांतिकारी” हे घोषणापत्र समोर आल्यानंतर सरकार पुन्हा सतर्क झाले. या नवीन दलाचे कार्यालय, घोषणा पत्राचे लेखक आणि दलाचे संचालक याचा वेगाने शोध सुरू झाला. 

हिंदुस्तानी प्रजातंत्र सेनेचे काम केवळ घोषणाबाजी आणि घोषणा पत्रापर्यंतच मर्यादित नव्हते. याचे खरे कार्य शस्त्रांचे एकत्रीकरण आणि निर्मिती होते. गदर संग्रामात सहभाग घेणारे अनेक अनुभवी क्रांतिकारी या नवीन अभियानात सहभागी झाले. हे सर्वजण बॉम्ब इत्यादी बनवण्यामध्ये निपुण होते. परंतु या क्रांती अभियानचे संचालन करण्यासाठी आर्थिक कमी आड येत होती.

या कमीला पूर्ण करण्यासाठी दलाच्या नेत्यांचे सरकारी खजिन्यांवर हल्ले करून तेथील धन आपल्या कडे घेण्याचे यशस्वी – अयशस्वी प्रयत्न सुरू केले. या सोबतच क्रांतिकारकांनी इंग्रज अधिकाऱ्यांशी सरळ टक्कर घेण्याचे अभियान सुद्धा सुरू केले.

पाहता पाहता पंडित राम प्रसाद बिस्मिल, चंद्रशेखर आझाद, राजेंद्र लाहिडी, अशफाकउल्ला खां, रोशन लाल, मन्मनाथ गुप्ता इत्यादी क्रांतिकारक पुन्हा सक्रिय झाले. हिंदुस्थानात प्रजातंत्र सेनेचे प्रमुख सच्चींद्रनाथ सन्याल यांचा उजवा हात योगेश चंद्र चटर्जी यांना महत्वाच्या कागदपत्रांसोबत हावडा स्टेशन वर पोलिसांकडून अटक करण्यात आले. या महत्वाच्या कागदपत्रांमध्ये हिंदुस्थानातील प्रजातंत्र सेनेच्या 23 केंद्रांची माहिती सुद्धा होती. या महत्वाच्या कागदपत्रांमध्ये प्रजातंत्र सेनेच्या महत्वाच्या बैठकांची सुद्धा माहिती होती. परंतु सरकारी अधिकाऱ्यांच्या लाख प्रयत्नांनंतर सुद्धा दलाच्या पूर्ण आखणी आणि कार्याची माहिती इंग्रजांना पूर्णपणे मिळू शकली नाही.

हिंदुस्तान प्रजातंत्र सेनेच्या नेत्यांनी विदेशातून शस्त्र मागविण्याची व्यवस्था सुद्धा व्यवस्था केली. जलमार्गातून भारतात पोहचणारी शस्त्रे बंदरावरून मिळवणे आणि वेगवेगळ्या केंद्रापर्यंत पोहोचवणे यासाठी बऱ्याच धनाची निकड होती. दलाकडे असणाऱ्या आर्थिक कमीमुळे हे सशस्त्र अभियान पुढे घेऊन जाणे अत्यंत अवघड होते.

शेवटी सगळ्या प्रमुख अधिकाऱ्यांनी कोणतातरी मोठा सरकारी खजिना लुटण्यासाठी बैठक घेतली. ही बैठक राम प्रसाद बिस्मिल यांच्या अध्यक्षतेखाली गुप्त ठिकाणी झाली. या बैठकीत असे ठरवण्यात आले की सरकारद्वारे रेल्वेमधून पाठवण्यात येणारा पोस्टल खजिना आपल्याकडे घेण्यासाठी सहानपुर जवळ काकोरी नावाच्या स्टेशनवर गाडी थांबवून “एक्शन” केली जावी. हे वीर कार्य करण्यासाठी 9 क्रांतिकारकांची निवड करण्यात आली. असे ठरवले गेले की गाडीची चेन ओढून स्टेशन येण्याआधी निर्जन ठिकाणी थांबवण्यात यावी. मध्ये सर्व क्रांतिकारकांनी आपली आपली हत्यारे सांभाळून रात्रीच्या वेळी सहानपुर स्टेशन वर एकत्र झाले.

ठरलेल्या वेळी गाडी आली आणि हे सर्व क्रांतिकारक त्यात बसले. या गाडीत काही इंग्रज अधिकारी सुद्धा या बेकायदेशीर शस्त्रांसोबत प्रवास करत होते. ठरलेल्या योजनेनुसार चेन ओढून ठरलेल्या ठिकाणी गाडी थांबवण्यात आली. दुसऱ्याच क्षणी लोखंडाची भक्कम तिजोरी खाली ढकलण्यात आली. ही तिजोरी एवढी भक्कम होती की अनेक प्रहार केल्या नंतर सुद्धा तुटली नाही.

जवळच हातात रिव्हॉल्व्हर घेऊन उभ्या असलेल्या अशफाक उल्ला खां यांनी आपले रिव्हॉल्व्हर आपल्या साथीदाराला दिले आणि स्वतः हातोडी घेऊन प्रहार करण्यास सुरुवात केली. या धडधाकट तरुण क्रांतिकारकाच्या 7- 8 प्रहारांनी च तिजोरी चे तोंड उघडले. या तरुणांनी सर्व धन काढले आणि आधीपासून च तयार ठेवलेल्या पिशव्यांमध्ये भरून निश्चित योजने नुसार ठरलेल्या ठिकाणी पोहोचले.

किती आश्चर्याची गोष्ट आहे की ज्या गाडीत ही ऐतिहासिक घटना घडली त्या गाडीत एका मेजर सोबत 20 इंग्रज शिपाई या खजिन्याच्या रक्षकांच्या रुपात चालले होते.जर त्यांना वाटले असते तर ते गोळीबार करून 9 क्रांतिकारकांना मारू शकत होते. यांच्याकडे शस्त्रांची कमी नव्हती. जिथे क्रांतिकारकांकडे फक्त 5 रिव्हॉल्व्हर आणि तिजोरी तोडण्यासाठी 2 हातोड्या होत्या. वास्तविकता ही आहे की जेव्हा गाडी थांबली तेंव्हा क्रांतिकारकांनी आपल्या रिव्हॉल्व्हर मधून 2 3 राऊंड हवेत चालवले; तर इंग्रज शिपाई आणि सार्जंट मेजर एवढे घाबरले की त्यांनी आपल्या आपल्या कंपार्टमेंटचे दरवाजे खिडक्या बंद केल्या. जेव्हा क्रांतिकारी आपले साहसी काम करत होते तेव्हा एक मुसलमान प्रवासी गाडीतून उतरला आणि क्रांतिकारकांच्या जवळ गेला. रामप्रसाद बिस्मिल यांनी त्याला गाडीत परत जाण्यास सांगितले. जेव्हा त्याने ऐकले नाही तेव्हा अशफाक उल्ला खां यांनी पुढे येऊन त्याला दोन गोळ्या मारल्या.

हिंदुस्तान प्रजातंत्र सेनेचे हे 9 क्रांतिकारी सैनिक गपचुप सुरक्षित आपल्या गुप्त ठिकाणी लखनऊ च्या एका ठिकाणी पोहोचले. जरी या जोखमीच्या साहसी कामाचे क्रांतिकारकांना फक्त 5000 रुपयेच मिळाले होते परंतु या घटनेने सरकार हलवून सोडले. दिल्लीपासून लंडनपर्यंत हाहाकार माजला. भक्कम पोलिस बंदोबस्त असून सुद्धा सरकारी खजिना लुटून क्रांतिकारक सुरक्षित निघून गेले.

प्रशासनाला एवढे मोठी आव्हान मिळाल्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांमध्ये भीती वाढणे स्वाभाविक होते. सरकारने या स्वातंत्र्य सैनिकांना पकडण्यासाठी पूर्ण ताकद लावली. गुप्तचरांच्या सक्रियतेमुळे आणि इंग्रजभक्त लोकांच्या मदतीमुळे प्रशासनाने 40 तथाकथित आरोपींना कैद केले. परंतु मुख्य आरोपी सच्चींद्रनाथ बक्षी. चंद्रशेखर आझाद आणि अशफाक उल्ला खां सरकारच्या पकडीतून बाहेर झाले. काही दिवसानंतर सच्चिदानंद आणि अश्फाक उल्ला खां सुद्धा कैद करण्यात आली. परंतु चंद्रशेखर आझाद तरीसुद्धा तावडीत आले नाहीत. सुरुवातीच्या तपासानंतर 28 जणांवर खटला चालवण्यात व आला बाकीच्यांना सोडून दिले.

या आरोपांवर ब्रिटिश सरकारने युद्ध छेडणे, डाका टाकणे, खून करणे आणि प्रशासनाविरुद्ध षडयंत्र करण्याचे आरोप लावले. सरकारने या क्रांतिकारकांच्या विरुद्ध 250 साक्षीदार तयार केले गेले. या सगळ्या एकतर्फी नाटकावर दहा लाख (आजच्या मूल्यानुसार दहा करोड) रुपये वाया घालवले. वकील आणि गुप्तरांना खरेदी करण्यासाठी एवढा खर्च करणे आवश्यक होते. सरकार कोणत्याही परिस्थितीत स्वातंत्र्यसंग्रामाच्या उमलत्या कळ्यांना कुस्करून टाकायची इच्छा धरून होती.

या राष्ट्रभक्त क्रांतिकारक आरोपींवर खूप काळापर्यंत चालवण्यात आलेले खटले शेवटी एप्रिल 1927 ला न्यायालयाने तोच निर्णय सांगितला ज्याचे सगळेच कल्पना करून होते. पंडित रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्र लाहीडी, रोशन सिंह आणि अशफाक उल्ला यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. बाकी सर्वांना निर्वासित केले, आजन्म कारावास, पंधरा वर्षे ते पाच वर्ष कठोर कारावास अशा शिक्षा देण्यात आल्या. सर्व क्रांतिकारकांनी भारत माता की जय च्या घोषणांमध्ये मृत्युदंडाच्या शिक्षा ऐकल्या.

उल्लेखनीय गोष्ट ही आहे की कोर्टाच्या सुनावणीनंतर सर्व आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये पाठवून फाशी देण्यात आले. जेव्हा इंग्रज ऑफिसरांनी यांची अंतिम इच्छा विचारली तेव्हा सगळ्यांनी एकच इच्छा सांगत म्हणाले- 

“आमची इच्छा आहे की ब्रिटिश साम्राज्यवादाचा विनाश व्हावा”. अशफाक उल्ला खां यांनी राष्ट्रभक्ती ने ओतप्रोत होत आपली इच्छा व्यक्त करताना म्हणाले- “कुछ आरजू नहीं है -बस आरजू है तो यह- है रख दे कोई जरा सी खाक- ए वतन कफन पे” अर्थात माझी इच्छा आहे की माझ्या मृतदेहावर माझ्या मातृभूमीची माती ठेवण्यात यावी.

इंग्रजांचे सिंहासन हादरवून सोडणाऱ्या काकोरी घटनेचे प्रमुख सूत्रधार राम प्रसाद बिस्मिल यांची आई आपल्या शूर मुलाला भेटण्यासाठी गोरखपूर कारागृहात गेली होती. या धाडसी गरोदर मातेला आपल्या बलिदान दिलेल्या मुलाला फाशी देण्यापूर्वी बघायचे होते. तुरुंगाच्या आत बांधलेल्या एका छोट्या खोलीत ही बैठक झाली. आईने आशीर्वाद देण्यासाठी हात पुढे करताच मुलगा रामप्रसाद बिस्मिलच्या डोळ्यात अश्रू तरळले. आईने धीटपणे मुलाच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली – “अरे, माझा मुलगा होऊन तू रडतोस, मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी शहीद होणार आहेस. तुला मृत्यूची भीती वाटेल अशी अपेक्षाही केली नव्हती. मला माझ्या देशभक्त वीरव्रती पुत्राचा अभिमान होता. माझा मुलगा एका विशाल साम्राज्याविरुद्ध लढताना मरत आहे. जर तुम्हाला मृत्यूची भीती वाटत असेल तर तुम्ही या कामात का गुंतलात?

 मृत्यूच्या उंबरठ्यावर उभे असलेले राम प्रसाद बिस्मिल आपले अश्रू पुसत म्हणाले – “आई, मला मृत्यूची कधीच भीती वाटत नाही. हे अश्रू माझ्या आईवरील प्रेमाचे अश्रू आहेत. विश्वास ठेव आई मी हसत हसत फासावर जाईन. तुझ्यासारख्या शूर मातेच्या पोटी मी पुन्हा जन्म घ्यावा आणि माझ्या देशासाठी असाच बलिदान देत राहावे अशी माझी इच्छा आहे. आई आणि मुलाची ही शेवटची भेट होती.

 काकोरी घटनेतील सर्व कथित आरोपींना सरकारने फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा दिली, पण या टोळीचा मुख्य प्रेरक चंद्रशेखर आझाद अद्याप सरकारी हेर, एजंट आणि माहिती देणाऱ्यांच्या हाती लागलेला नाही. चंद्रशेखर आझाद लहानपणापासूनच बंडखोर आणि क्रांतिकारी स्वभावाचे होते. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी या बालक्रांतिकारकाने त्यावेळी सुरू असलेल्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. या कथित बंडखोराला पोलीस अधिकाऱ्याने 12 फटके मारले. फटकेबाजी करताना चंद्रशेखर भारत माता की जयच्या घोषणा देत राहिले. या बालक्रांतिकारकाची कातडी गळून पडली पण त्याच्या चेहऱ्यावर भीतीची किंवा भीतीची एक रेषही उमटली नाही.

 चंद्रशेखर आझाद एकदा आपल्या साथीदारांना म्हणाले होते – “मी अटक करून आणि पोलिसांच्या साखळदंडात अडकल्यानंतर आणि माकडासारखा नाचून तुरुंगात जाणार नाही. जेव्हा जेव्हा अशी संधी येईल तेव्हा मी माझ्या रिव्हॉल्व्हरने अनेक पोलिसांना गोळ्या घालेन आणि माझ्या छातीत शेवटची गोळी झाडेन.

 असाच काहीसा प्रकार अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये चंद्रशेखर आझाद यांनी स्वत:ला घेरलेला पाहून 15 पोलिसांना यमलोकात घेऊन रिव्हॉल्व्हरने 16 वी गोळी त्यांच्या कपाळावर झाडली. चंद्रशेखर आझाद लहानपणापासून आयुष्याच्या शेवटपर्यंत ‘आझाद’ राहिले. काकोरी घटनेसह पराक्रमी क्रांतिकारी कार्यात मोलाची भूमिका बजावणारे चंद्रशेखर आझाद यांनी 27 फेब्रुवारी 1931 रोजी स्वातंत्र्ययुद्धातील निर्भय सेनापतीप्रमाणे लढत आपल्या देशासाठी बलिदान दिले.

क्रमश:

नरेंद्र सहगल
पूर्व संघप्रचारक, लेखक, पत्रकार

मराठी अनुवाद – सखी कुलकर्णी

author avatar
नरेंद्र सहगल