शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का ; ‘हा’ नेता शिंदे गटात नाही तर या पक्षात करणार प्रवेश

सप्टेंबर 8, 2022 2:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२२ । राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एक एक करत शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. अशातच शिवसेनेला (shivsena) आणखी एक मोठा धक्का बसणार आहे.अमरावतीचे शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश वानखेडे (Rajesh Wankhede) आज शिंदे गटात नव्हे तर थेट भाजपमध्ये (bjp) प्रवेश करणार आहेत.

udhav thakre jpg webp

आज नागपूरमध्ये (Nagpur) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत राजेश वानखडे भाजपचा झेंडा हाती घेणार असल्याची माहिती आहे. अमरावती जिल्ह्याचे शिवसेना नेता आणि आतापर्यंत जिल्हा प्रमुख सारख्या जबाबदार पदावर राहणारे राजेश वानखडे आता शिवसेना सोडून भाजपामध्ये प्रवेश करत आहे.

राजेश वानखडे यांनी 2019 मध्ये काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्याविरोधात तिवसा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. वानखेडे हे अमरावतीतील मोठं प्रस्थ आहे. त्यांच्या सोडचिठ्ठीमुळे शिवसेनेला मोठं खिंडार पडणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्यासोबत असंख्य शिवसैनिकही भाजपमध्ये जाणार असल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now