जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२१ । अमळनेर तालुक्याला दोन रुग्णवाहिका मिळाले असून त्याचे लोकार्पण आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
अमळनेर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र, मांडळ येथे असणार्या रूग्णवाहिका जुन्या झाल्यामुळे अडचणी येत होत्या. यातच कोरोनाची आपत्ती सुरू झाल्यानंतर वाढीव प्रमाणात रूग्णवाहिकांची आवश्यकता निर्माण झाली होती, याची दखल घेऊन तत्परतेने आमदार अनिल पाटील यांनी राज्य शासनाकडे अमळनेर तालुक्यासाठी रूग्णवाहिकांची मागणी केली होती.याला शासनाने मंजुरी दिली असून यातील पहिल्या टप्प्यात 2 रूग्णवाहिका तालुक्यासाठी प्राप्त झाल्या आहेत. तर उर्वरित रूग्णवाहिका लवकरच प्राप्त होणार आहेत.
या रूग्णवाहिकांचे आज ग्रामीण रूग्णालयात लोकार्पण करून त्यांना शासकीय सेवेसाठी अर्पीत केल्या. यावेळी रूग्णवाहिका चालकांना प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करून त्यांच्याकडे चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी पं.स.सदस्य प्रविण पाटील, निवृत्ती बागुल,विनोद जाधव, कार्याध्यक्ष प्रा सुरेश पाटील,राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष गौरव पाटील,डाॅ दिलिप पाटोळे अति. जिल्हा आरोग्य अधिकारी, डाॅ गिरीश गोसावी तालुका आरोग्य अधिकारी, डाॅ प्रकाश ताळे अधिक्षक ग्रामीण रुग्णालय, डाॅ विलास महाजन वैद्यकीय अधिकारी न.प., डाॅ जी.एम.पाटील वैद्यकीय अधिकारी, डाॅ सागर पाटील वैद्यकीय अधिकारी मांडळ, डाॅ.राजेंद्र शेलकर वैद्यकीय अधिकारी न.प., हरीष चौधरी, चालक भुषण पाटील, प्रदीप पाटील, राहुल गोत्राळ, योगेश पाटील, पप्पुभैय्या कलोसे उपस्थित होते.