⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

सावधान..! जळगावसह ‘या’ जिल्ह्यांना पुढचे ३ ते ४ तास महत्वाचे, IMD कडून अलर्ट जारी

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२३ । जळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्याला गारपिटीसह वादळी पावसाने झोडपून काढलं आहे. ऐन उन्हाळ्यात पाऊस होत असल्याने नेमका आता उन्हाळा आहे कि पावसाळा? असा प्रश्न पडू लागला आहे. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार सह काही जिल्ह्यांना पुढचे ३ ते ४ तास महत्वाचे आहे. हवामान खात्याकडून या जिल्ह्यांना विजांचा कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा दिला आहे. याबाबत

भर उन्हाळ्यात अवकाळी पाऊस गेल्या काही दिवसापासून राज्यात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. काही जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

जळगाव जिल्ह्यात देखील अवकाळीने पावसाने थैमान घातले आहे. बुधवारनंतर सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तर काही ठिकाणी गारपीट झाल्याने शेती पिकांचे मोठं नुकसान झालं. दरम्यान राज्यात अद्यापही अवकाळी जोर कायम आहे.

दरम्यान, जळगावसह धुळे, नंदुरबार, अहमदनगर, बीड, परभणी, छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यांना पुढील ३ ते ४ तासात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या दरम्यान, 30-40kmph वेगाने सोसाट्याचा वारा वाहणार. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.

दरम्यान, अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. अवकाळीमुळे तापमानाचा पारा घसरला आहे. यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.