अरेरे…यावलात मध्यरात्री जुगार अड्यावर पोलिसांचा छापा..

जून 13, 2022 10:06 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२२ । यावल शहरातील खिर्णीपुरा भागातील जुगार अड्ड्यावर यावल पोलिसांनी छापा टाकून १० जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई शनिवारी रात्री करण्यात आली.

crime 2022 06 13T100613.343 jpg webp

शहरातील खिर्णीपुरा भागात जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शनिवारी रात्री सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान, सहायक फौजदार अस्लम खान, गणेश ढाकणे, गनी मिर्झा, अल्लाउद्दीन तडवी, मोहन तायडे यांच्या पथकाने शहाबुद्दीन चिरागोद्दीन यांचे घरासमोर अंगणात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यात जुगार खेळणारे अमोल राहुल सुरवाडे (रा सिद्धार्थ नगर), रमजान खान सुभान खान (रा.खिर्नीपुरा), अझरुद्दीन शहाबोद्दीन (रा.आयशा नगर), रफिक शेख कालू, नईमखान सलीम खान, आरिफ खान गनी खान, सईद खान शाहीखान, शेख जफर शेख शकील, जफर शहा रहेमान शहा व शेख शमशोद्दीन शेख कुतुबुद्दीन (सर्व रा.खिर्णीपुरा) या १० जणांना ताब्यात घेतले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now