अरेरे.. डबल नास्ता न मिळाल्याच्या कारणावरून कैद्यांमध्ये तुफान हाणामारी

ऑगस्ट 28, 2022 1:18 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२२ । डबल नास्ता न मिळाल्याच्या कारणावरून कैद्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना जळगावातील कारागृहात घडल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चौघा कैद्यांविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jalgaon crime 2 1 jpg webp

कारागृहातील कैद्यांना करण पवार हा नाश्ता वाटप करीत असताना शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या गोळीबारच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेला सतीश मिलिंद गायकवाड याला करणने डबल नाश्ता न दिल्याने त्यांच्यात चांगलाच वाद झाला. त्यानंतर सतीश गायकवाड हा बंदी मुलाखत विभागाकडून त्याच्या बॅरेककडे जात असताना कॉरंटाईन विभागाच्या बॅरेकसमोर जात असतांना करण युवराज पवार व त्याच्यासोबत असलेले विलास चंद्रसिंग पठाण, अर्जुन युवराज पवार हे याठिकाणी आले. त्यांनी सतीश गायकवाड सोबत हुज्जत घालून त्याला शिविगाळ करीत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

कारागृहात हाणामारी सुरू असल्याचे कळताच तुरुंग अधिकारी गजानन पाटील, पोलिस शिपाई गजानन चव्हाण यांच्यासह इतर बंद्यांनी मिळून त्यांचे भांडण सोडाविले. या घटनेत करण पवार याच्या डाव्या पायाला व हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे तर सतीश गायकवाड याच्या तोंडाला मुक्का मार लागला. या प्रकरणी चौघांविरोधात जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now