---Advertisement---
जळगाव जिल्हा महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं पाचोरा रेल्वे अपघातामागचे खरं कारण? काय होते?..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील पाचोरा (Pachora) नजीकच्या परधाडे (Pardhade) रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी एक मोठी रेल्वे दुर्घटना (Railway Accident) घडली. आग लागल्याच्या अफवेनं प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेस (Pushpak Express) मधून उड्या मारल्या. पण त्याचवेळी समोरून भरधाव वेगानं येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसनं अनेक प्रवाशांना चिरडलं. यात १३ जण ठार झाले तर जवळपास २० प्रवाशी जखमी झाले. दरम्यान हा रेल्वे अपघात घडला कसा? या अपघातासाठी कोण जबाबदार? याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.

JLCE

‘जळगावमध्ये घडलेली घटना अतिशय दुर्देवी आहे. या घटनेची माहिती आम्ही घेतली. माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की, रेल्वे डब्यातील स्वयंपाक कक्षातील एका चहा विक्रेत्यानं आग लागली म्हणून आरडाओरड केली. आग लागली या भीतीनं गोंधळ उडाला. हा गोंधळ पाहून शेजारच्या दुसऱ्या डब्यातील प्रवाशांमध्येही गोंधळ उडाला. काही प्रवाशांनी घाबरून जीव वाचवण्यासाठी रेल्वेतून उड्या मारल्या.’

---Advertisement---

‘काही प्रवासी उतरू शकले. तर रेल्वेचा वेग अधिक असल्यामुळे काही प्रवासी उतरू शकले नाही. रेल्वेचा वेग जास्त असल्यामुळे एकानं रेल्वेची साखळी ओढली. त्यामुळे रेल्वे थांबली आणि प्रवासी खाली उतरले. मात्र, शेजारच्या ट्रॅकवरून कर्नाटक एक्सप्रेस अतिशय वेगानं येत होती. जीव वाचवण्याच्या घाईत प्रवासी सैरावैरा पळू लागले. रेल्वे ट्रॅक क्रॉस करत असताना, कर्नाटक एक्सप्रेसनं प्रवाशांना चिरडलं. त्यानंतर एक्सप्रेस पुढे जाऊन काही अंतरावर थांबली. या घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला. तर, काही जण जखमी असल्याची माहिती समोर आलीय. यातील १० मृत लोकांची ओळख पटली तर, ३ मृत लोकांची ओळख पटलेली नाही. तसेच ही घटना निव्वळ अफवांमुळे घडली असल्याचं’ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---