⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

पाचोऱ्यातील कार्यक्रमात अजित पवारांचा उद्धव ठाकरेंवर टोला ; म्हणाले..

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२३ । आज पाचोरा येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सरकारचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी संबोधित करताना अजित पवार यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

नेमकं काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार म्हणाले, “आम्ही कुठेही गेलो तर विकासचं बोलतो मात्र काही जण येतात. बेताल वक्तव्य करतात. मला टीका करता येत नाही का. मी पण वाभाडे बाहेर काढू शकतो पण यातून प्रश्न सुटणार नाहीत असा टोला उद्धव ठाकरेंवर लगावला.

टीका करून रोजगार मिळणार नाही. काहीजण फक्त नौटंकी, नाटकीपणा करतात. पण यातून महाराष्ट्राचे भलं होणार नाही, असे ते म्हणाले. केंद्राच्या आणि राज्याच्या योजना तुमच्यापर्यंत आणण्याचे काम शासन आपल्या दारी कार्यक्रम सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमी सांगतात हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. शासन सर्वांच्या पाठीशी आहे.असंही अजित पवार म्हणाले.

महायुतीच्या सरकारमध्ये जळगाव जिल्ह्याला चांगल मंत्रीपद दिले आहे. गिरीश महाजन यांना देखील ग्रामविकास मंत्रिपद आहे. त्यांनी याचा फायदा जळगाव जिल्ह्याला करुन द्यावा. जिल्ह्यातील १५ तालुक्यांचा विकास झाला पाहीजे. मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे अर्थ व नियोजन खात्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे निधीची कमतरता पडू देणार नाही, असे अजित पवार म्हणाले.