‘ही’ एक्स्प्रेस मनमाडऐवजी भुसावळ स्थानकातून सोडण्याची मागणी

जुलै 21, 2024 3:48 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२४ । भुसावळ व जळगाव येथून सिकंदराबादला जाण्यासाठी आठवड्यातून केवळ सोमवार, शनिवार व बुधवार असे तीन दिवस साप्ताहिक रेल्वेगाड्या आहेत. त्यातही या गाड्यांना चाळीसगाव, पाचोरा स्थानकावर थांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. ही गैरसोय दूर करण्यासाठी मनमाड येथून दररोज सिकंद्राबादला धावणारी अजिंठा एक्स्प्रेस मनमाडऐवजी भुसावळ स्थानकातून सोडण्यात यावी, अशी मागणी आहे

train 3 jpg webp

१७०६४ सिकंदराबाद-मनमाड अजिंठा एक्सप्रेस ही गाडी सायंकाळी ७ वाजता सुटते ती मनमाड येथे सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी येते. तर १७०६३ मनमाड सिंकंदराबाद ही गाडी रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी सुटते व दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता सिकंदराबादला पोचते

यादरम्यान तब्बल १२ तास ही गाडी मनमाड स्थानकावर उभी असते. यामुळे ही गाडी भुसावळ जंक्शनवरून सोडावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून आहे. ही गाडी भुसावळपर्यंत वाढवल्यास भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव येथील प्रवाशांना फायदा होईल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now