जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२२ । जळगाव शहरातून मुंबईसाठी विमानसेवा सुरु करण्यात आली होती मात्र हि विमानसेवा खंडीत हाेण्यास ३० एप्रिल राेजी आता दाेन महिने पूर्ण होत आहेत. ही सेवा केव्हा पूर्ववत सुरु हाेईल, याबाबत मक्तेदार कंपनीकडून काेणतेही स्पष्टीकरण अद्याप करण्यात आलेले नाही.
येथील विमानतळावरून अहमदाबाद-जळगाव व जळगाव मुंबई या दाेन शहरासाठी ट्रु-जेट या विमान कंपनीतर्फे आरसीएस याेजनेंतर्गत दाेन वर्षापासून सेवा पुरविली जात आहे. काेराेना संसर्गातील अडीच तीन महिन्यांचा कालावधी वगळता कंपनीने सेवा दिली. त्यानंतर नांदेड, काेल्हापूर या दाेन शहरांचाही यात समावेश करण्यात आला हाेता; मात्र चार महिन्यांपूर्वी त्यात बदल करून केवळ जळगाव-मुंबई या रुटवरच वेळेत बदल करून सेवा पुरविण्यात येत हाेती. ती देखील १ मार्चपासून बंद करण्यात आली. याबाबत विमान कंपनी व्यवस्थापनातर्फे विमान प्राधिकरणाला ऑपरेशनल रिझनमुळे सेवा देत नसल्याबाबत वेळाेवेळी मुदत वाढवत कळविले. याला ३० एप्रिल राेजी दाेन महिने पूर्ण हाेत आहे. तर १ मे नंतर सेवा सुरु करणार किंवा कसे याबाबत कंपनीतर्फे स्थानिक विमान प्राधिकरणाला काही कळवले नसल्याचे प्राधिकरणाचे स्थानिक संचालक सुनील मग्गरीवार यांनी सांगितले आहे.