जळगाव शहर

डॉ.उल्हास पाटील कृषि अभियांत्रिक महाविद्यालयात कृषी दिन साजरा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२२ । डॉ. उल्हास पाटील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राज्यातील हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र कृषि दिवस साजरा करण्यात आला.

डॉ. शैलेश तायडे, कृषि महाविद्यालय, जळगांव तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. सपकाळे, उपप्राचार्य डॉ. कुशल ढाके,सर्व प्राध्यापक वर्ग यांच्या उपस्थितीत वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्वयंसेवक भुषण भवरने केले. त्यांनतर स्वयंसेविका कृतीका हरणे व कोमल भवर यांनी भाषणातून वसंतराव नाईक यांचे विचार मांडले.

डॉ. शैलेश तायडे, डॉ. पी. आर. सपकाळे व डॉ. कुशल ढाके यांनी महाराष्ट्र् कृषि दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आधुनिक शेती काळाची गरज आहे तसेच कृषि अभियांत्रिकी बद्दलची माहिती जन सामान्य लोकांपर्यंत पोहचविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. यामुळे शेतकरी सदन होईल. कार्यक्रमाच्या शेवटी स्वयंसेवक तेजस जाधव याने सर्वांचे आभार मानले. त्यावेळी सर्व प्राध्यापक वर्ग व स्वयंसेवक उपस्थित होते.

Related Articles

Back to top button