⁠ 
शनिवार, जुलै 20, 2024

रोजंदारी वाढण्यासाठी शेतमजुर महिलांचा ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगांव लाईव्ह न्युज| सुभाष धाडे | शेतात राब-राब राबुन तुटपुंजी मंजुरी मिळत असल्याने मिळणाऱ्या मजुरीच्या पैशांत प्रपंच कसा हाकायचा. महागाईमुळे मिळणारी तोडकी मजुरी वाढविण्यासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे पिप्रीनादू येथील शेतमजुर महिलांनी मोठ्या संख्येने एकत्र येत भव्य मोर्चा काढला.

मौजे पिप्रीनांदू येथील शेतातील कामे रोजंदारीवर करण्याऱ्या महिलांनी मिळणारी रोजंदारी वाढवण्यासाठी महिलांचा भव्य मोर्चा ग्रामपंचायत स्तरावर घेण्यात आला बहुजन वंचित आघाडीच्या महिला अध्यक्ष संगीता धोबी व तालुका अध्यक्ष दिलीप पोहेकर यांच्या नेतृत्वाखाली आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या धोरणानुसार गावातील रोजंदारी करणाऱ्या महिला न्याय हक्य मिळावा पिप्रीनांदु शेतकऱ्यांकडे वर्षानुवर्ष राबराब राबताहेत निंदनी सह शेती विषयक काम करत आहेत त्यांना गावांमध्ये फक्त आणि फक्त १२५ रुपये श्रम रोजभाग दिला जातो १२५ च्या व्यतिरिक्त महागाई नुसार दोनशे रुपये मजुरी मिळावी त्यासाठी प्रशासन ग्रामपंचायत मीनलजी महाजन व ग्रामसेवक दीपक कोळी यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व समाज कार्यकर्त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

सुधारित शेतकऱ्यांकडून बऱ्याच वर्षापासून मध्यंतरी मनसे तालुका अध्यक्ष मधुकर भोई माजी ग्रामपंचायत सदस्य संगीता धोबी माजी सरपंच सुलाबाई भिल यांनी २०१४ मध्ये ८० रुपयाच्या ऐवजी सव्वाशे रुपये रोजंदारी मिळावी या साठी संप पुकारला होता. त्यानुसार सव्वाशे रुपये पर्यंत मजुरी झाली. आता जवळपास दहा वर्षे झाले गावोगावी शेजारी गावांमध्ये दोनशे रुपये प्रमाणे महिलांना रोज मिळतो आणि पिंपरी नांदू मध्ये १२५ रुपये मिळतो त्यासाठी बहुजन वंचित आघाडीच्या माध्यमातून हा मोर्चा ग्रामपंचायत स्तरावर भव्य मोर्चा नेण्यात आला. आणि यासंदर्भात शेतकरी माजी सरपंच विनोद राजाराम पाटील सह शेतकरी बांधव उपस्थित होते.

आश्वासित केले दीड शे रुपयांपर्यंत कष्टकरी महिलांना रोजंदारी मध्ये वाढ व्हावी त्यासाठी काही दिवसात शेतकऱ्याच्या वतीने निर्णय घेऊ असे आश्वासन दिले खरंच या महागाई मध्ये शे सव्वाशे रुपये पुरत नाही भागात नाही महिला सकाळी ९ ते ३ वाजेपर्यंत शेतात निंदणी करतात मोहबदला त्यानुसार अपेक्षित आहे म्हणून आजचा मोर्चा ग्रामपंचायत स्तरावर घेण्यात आला जर का रोजंदारी वाढली नाही तर तालुक्यात हा मोर्चा भव्य स्वरूपाने घेण्यात येईल यामध्ये भोई,चांभार,कोळी,भील,बौध्द धनगर, मांग आदी १७५ महिलांनी सहभाग नोंदविला सह्या स्वाक्षऱ्या केल्या आहेत.