जळगाव जिल्हा
पिंप्रीला ‘पीएमएफएमई’ अंतर्गत कृषी प्रक्रिया जागृती पंधरवाडा!
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२२ । ‘पीएमएफएमई’ अंतर्गत पिंप्री कृषी प्रक्रिया जागृती पंधरवाडा कार्यक्रमाचे करण्यात आले होते. उदघाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. यावेळी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेण्यासाठी अर्ज नोंदणी बाबत मोहीम राबवण्यात आली.
कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा संसाधन व्यक्ती समाधान पाटील, तालुका कृषी अधिकारी किरण देसले, माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी, कृषी सहाय्यक पद्माकर पाटील उपस्थित होते. ‘पीएमएफएमई’ अंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करून लाभ घ्यावा असे आव्हान तालुका कृषी अधिकारी किरण देसले यांनी याप्रसंगी केले.