शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण मिळाल्याने मोदी देणार शिंदेंना केंद्रात ३ मंत्रिपद?

जळगाव लाईव्ह न्यूज | 18 फेब्रुवारी 2023 | शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्यांनतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता एकनाथ शिंदेंना गिफ्ट देण्याच्या तयारीत आहेत. कारण केंद्रात शिंदेंच्या ३ खासदारांना मंत्रिपद मिळण्याची चर्चा रंगू लागली आहे.

मोदी सरकार मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवूनच केंद्रीय मंत्रिमंडळाळचा विस्तार करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पर्यायी शिंदे गटातील कुठल्या नेत्याला संधी मिळते याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून आहे.

महाष्ट्रात सत्तातर झाल्यानंतर अनेक दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार यावर चर्चा सुरु आहे. अशात राज्याआधीच आता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला असल्याच्या चर्चा आहेत.