VIDEO : उमेदवारी जाहीर होताच आ.राजूमामा भोळे यांनी मानले भाजप नेत्यांचे आभार
जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२४ । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज रविवारी भाजपकडून 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये जळगाव शहरातून आमदार राजूमामा भोळे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली. दरम्यान उमेदवारी झाल्यानंतर आमदार राजूमामा भोळे यांनी राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन यांच्या भाजप नेत्यांचे आभार मानले आहेत.
काय म्हणाले नेमकं राजूमामा?
दोनदा आमदार झाल्यानंतर पुन्हा आता तिसऱ्यांदा मला माझ्यावर पक्षाने विश्वास टाकलेला आहे. त्याबद्दल पक्षाचा मी खूप खूप आभारी आहे. गेल्या दहा वर्षात ज्या पद्धतीने काम केलं त्याच पद्धतीने काम करण्याचा मी प्रयत्न करेल असा विश्वास या ठिकाणी आमदार सुरेश भोळे यांनी व्यक्त केला आहे.
भारतीय जनता पार्टी बरोबरच महायुतीच्या नेत्यांचे सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतो असं सुद्धा सुरेश भोळे यांनी म्हटलं आहे. कार्यकर्त्यांचा देखील यामध्ये सिंहाचा वाटा आहे त्यामुळे त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. देव देश राष्ट्रधर्म अशा पद्धतीने गेल्या दहा वर्षात माझी कामगिरी राहिली आहे काही काम नक्कीच राहिले आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच यावेळी सुद्धा जनता मला आशीर्वाद देईल असा विश्वास सुद्धा आमदार भोळे यांनी व्यक्त केला आहे