⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | ॲड. रोहिणी खडसेंनी घेतली ‘गारबर्डी पुरातुन’ सुटका झालेल्या मुलांची भेट

ॲड. रोहिणी खडसेंनी घेतली ‘गारबर्डी पुरातुन’ सुटका झालेल्या मुलांची भेट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज | सुभाष धाडे | सोमवारी दुपारी चारच्या सुमारास रावेर तालुक्यातील गारबर्डी येथील सुकी नदीवरील धरणाच्या खालील बाजूस पुरामुळे अडकून पडलेल्या मुक्ताईनगर येथील नऊ तरूणांची रात्री दहाच्या सुमारास स्थानिक प्रशासन तसेच स्थानिकांनी सुखरूपपणे सुटका केली. मोहिम राबवून

या घटनेतील तरुण हे अतिशय घाबरून गेले असून त्यांच्या मनात भिती निर्माण झाली आहे.दरम्यान, आज महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांनी त्या युवकांची भेट घेऊन भेदरलेल्या युवकांना दिलासा दिला.तसेच दूरध्वनीद्वारे सावदा पोलीस प्रशासनाचे आणि स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांचे आभार मानले.

यावेळी समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजु भाऊ माळी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू भाऊ सापधरे, सामाजिक कार्यकर्ते धनंजयभाऊ सापधरे, बाळाभाऊ भालशंकर, संजयभाऊ कोळी,प्रदिप भाऊ साळुंखे, चेतन भाऊ राजपूत, भुषण भाऊ पाटील आणि पदाधिकारी उपस्थित होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.