डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

जुलै 20, 2026 3:31 PM

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध कृषी अभ्यासक्रमांसाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (धउचजण), नाशिक संलग्न विविध कृषी शिक्षणक्रमांसाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी ३१ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

dr krushi college

विद्यापीठाच्या जुलै २०२६ प्रवेश प्रक्रियेनुसार कृषी शिक्षणक्रमांसाठी प्रवेश सुरू आहेत.महाविद्यालयामार्फत कृषी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम, कृषी अधिष्ठान अभ्यासक्रम, उद्यानविद्या पदविका, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, कृषी पत्रकारिता, फळ उत्पादन, भाजीपाला उत्पादन तसेच फ्लोरीकल्चर व लँडस्केप गार्डनिंग यांसारखे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे अभ्यासक्रम शेतकरी, विद्यार्थी, कृषी उद्योजक तसेच कृषी क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्‍या युवकांसाठी उपयुक्त ठरणार आहेत.महाविद्यालयाची विशेष बाब म्हणजे आठवड्यातील शनिवार व रविवारी प्रत्यक्ष प्रशिक्षण, अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन, आधुनिक शैक्षणिक सुविधा, डिजिटल शिक्षण व्यवस्था आणि प्रत्यक्ष शेतीतील कौशल्य विकासावर भर दिला जातो.

त्यामुळे विद्यार्थ्यांना सैद्धांतिक ज्ञानाबरोबरच व्यावहारिक अनुभवही मिळतो.अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कृषी सेवा केंद्र परवाना मिळविण्यासाठी आवश्यक पात्रता, विविध शासकीय व निमशासकीय नोकर्‍यांच्या संधी तसेच कृषी व्यवसाय, कृषी उद्योग, फलोत्पादन, भाजीपाला उत्पादन आणि स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात, अशी माहिती महाविद्यालयाकडून देण्यात आली आहे.

प्रवेशासाठी जातीचा दाखला (लागू असल्यास), नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र (लागू असल्यास), दहावी गुणपत्रिका, टी.सी., आधार कार्ड, पॅन कार्ड, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक, छायाचित्र व स्वाक्षरी आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे.अधिक माहितीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथे संपर्क साधून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाने केले आहे. अधिक माहितीसाठी +९१ ९७१४९ ४७१३१ डॉ शैलेश तायडे यांच्याशी संपर्क साधावा.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now