शासकीय निवासी शाळेत इयत्ता ६वी ते १०वीच्या वर्गाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू

मे 6, 2026 5:02 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य तसेच सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, जळगाव यांच्या अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणाऱ्या शासकीय निवासी शाळा, चाळीसगांव येथे इयत्ता ६ वी ते १० वी या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया दिनांक १ एप्रिल २०२६ पासून सुरू करण्यात आली आहे.

school

इयत्ता ६ वीच्या वर्गासाठी आरक्षित जागेनुसार एकूण ४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून त्यामध्ये ८० टक्के अनुसूचित जाती, १० टक्के अनुसूचित जमाती, ५ टक्के वि.जा.भ.ज., ३ टक्के वि.मा.प्र. तसेच २ टक्के दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आरक्षण राखीव ठेवण्यात आले आहे. तसेच इयत्ता ७ वी ते १० वी या वर्गांतील रिक्त जागांनुसारही प्रवेश देण्यात येणार आहे.

सद्यस्थितीत प्रवेशासाठी नावनोंदणी प्रक्रिया सुरू असून पालकांनी आपल्या पाल्यांची लवकरात लवकर नोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांशी संपर्क साधावा.

शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणासह आनंददायी अध्यापन पद्धती, प्रशिक्षित शिक्षकवर्ग, विविध स्पर्धा परीक्षांची तयारी, इयत्ता ८ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी टॅब सुविधा, अद्ययावत संगणक कक्ष, स्वतंत्र रात्र अभ्यासिका, विज्ञान प्रयोगशाळा, मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश, शालेय साहित्य, डिजिटल क्लासरूम, सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त इमारत, निवास व भोजन व्यवस्था, क्रीडांगण व क्रीडा साहित्य, तसेच सुरक्षा रक्षक व २४x७ सीसीटीव्ही यांसारख्या विविध सोयी उपलब्ध आहेत.

संपर्कासाठी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, जळगाव – ०२५७-२२६३३२८, सागर विशे (मुख्याध्यापक) – ७०२१४१३९७०, लक्ष्मीकांत कोठावदे (प्र. गृहपाल) – ९४२०६९५७९३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now