⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | जिल्ह्यात आठ बाजार समित्यांवर आता प्रशासक राज

जिल्ह्यात आठ बाजार समित्यांवर आता प्रशासक राज

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२२ । कोरोना महामारी तसेच विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या निवडणुकांमुळे मुदतवाढ देण्यात आलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश राज्याच्या सहकार व पणन विभागाने दिले.

कोरोना काळ आणि विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या निवडणूक प्रक्रियेमुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाला आज शनिवारी म्हणजे दि. 23 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता मात्र कोरोना परिस्थीती नियंत्रणात असून सोसायट्यांच्या निवडणुकांचा टप्पाही पार पडला आहे. त्यामुळे आणखी मुदतवाढ देता येत नसल्याने राज्याच्या सहकार व पणन विभागाने मुदत संपलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यातील आठ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यात आली असुन ती शनिवारी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे जळगावसह भुसावळ, रावेर, यावल, जामनेर, चोपडा, बोदवड आणि पारोळा या बाजार समित्यांवर सोमवारपासून प्रशासक बसणार आहेत. सहा महिन्याच्या आत निवडणूक प्रक्रिया पुर्ण करण्याचे आदेशही राज्याच्या सहकार व पणन विभागाने दिले आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह