आदिशक्ति संत मुक्ताई मंदिर देवस्थानाला ‘ब’ देवस्थानाचा दर्जा

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२२ । मुक्ताईनगरातील आदिशक्ति संत मुक्ताई मंदिर देवस्थान, श्री क्षेत्र मेहुण मंदिराचा तीर्थक्षेत्राला ‘ब‘ देवस्थानाचा दर्जा देण्यात आला आहे. याबाबतच्या प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मंजुरी दिली. यासाठी आ. चंद्रकांत पाटील यांनी देखील पाठपुरावा केला होता.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने तसेच आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. ग्रामविकास विभाग तीर्थक्षेत्र विकासच्या माध्यमातून मंदिर परिसरातील विकासकामांना निधी प्राप्त होणार आहे. मंदिराचा महाराष्ट्र शासनाच्या तीर्थक्षेत्र ‘ब‘ दर्जात समावेश व्हावा या साठी संस्थानचे अध्यक्ष रामराव महाराज, सारंगधर महाराज, सुधाकर महाराज तसेच मेहुणचे माजी सरपंच विकास पाटील, एम.टी.चौधरी (तांदलवाडी), एकनाथ हरी पाटील (तांदलवाडी) यांनी नंदकिशोर महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला होता.