महायुतीचे उमेदवार अमोल पाटीलांना समर्थन देण्याकरिता अभिनेता गोविंदा यांचा रॉड शो.. !

नोव्हेंबर 16, 2024 10:38 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अमोल पाटील यांच्या प्रचारासाठी प्रख्यात सिने अभिनेते गोविंदा आहुजा यांच्या रॅलीचे भव्य रोड शोचे आयोजन आज शनिवार १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पांच वाजता करण्यात आले आहे.

govinda amol patil

एरंडोल – पारोळा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे पक्ष महायुतीचे उमेदवार अमोल पाटील यांचा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू झाला आहे. त्यामुळे मतदारसंघातील प्रत्येक भागात महायुतीचे कार्यकर्ते अमोल पाटील यांचा प्रचार करत आहे. तसेच अमोल पाटील हे देखील मतदार संघात प्रत्येक गावात जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहे. अमोल पाटील यांच्या प्रचारार्थ सिने अभिनेते गोविंदा हे एरंडोल शहरात आज शनिवार १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पांच वाजता येत आहे.

सिने अभिनेता गोविंदा यांच्या रोड शोची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरुवात होणार आहे हा रोड शो महात्मा फुले पुतळा, नागोबा मढी, अमळनेर दरवाजा, श्री विठ्ठल मंदिर पांडव वाडा, श्रीराम मंदिर,भोई गल्ली, जे डी सी सी बँक, राजे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बुधवार दरवाजा, चुनाभट्टी, रंगारी खिडकी पूल, श्री दत्त मंदिर, जय हिंद चौक, मेन रोड, व जोहरी गल्लीतील गुरुद्वारावर या रोड शोच्या समारोप होणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now