⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव जिल्ह्यातील आणखी दोन गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई

जळगाव जिल्ह्यातील आणखी दोन गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । 30 जानेवारी 2024 । जिल्हा पोलीस दलाकडून गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर कारवाईचा धडाका सुरू केला. जळगाव जिल्ह्यातील आणखी दोन जणांवर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. याबाबतचे आदेश आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहे. रमण उर्फ माकू बापू नामदास (रा. स्टेशन रोड अमळनेर) आणि योगेश उर्फ भुऱ्या वसंत चव्हाण (वय-३२ रा. बजरंगपुरा जामनेर) असे स्थानबद्ध केलेल्या गुन्हेगारांचे नाव आहेत.

याबाबत असे की, अमळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रमण उर्फ माकू बापू नामदास याच्यावर अमळनेर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या स्वरूपाचे ४ गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यावर २ प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेले आहे, असे असून देखील त्याच्यात कुठलीही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी एमपीडीए अंतर्गत धोकादायक व्यक्ती म्हणून याला स्थानबद्ध करावे, असा अहवाल जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात पाठविला

त्याचप्रमाणे जामनेर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गुन्हेगार योगेश उर्फ भुऱ्या वसंत चव्हाण याच्यावर जामनेर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे वेगवेगळे ६ गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्यावर ४ वेळा प्रतिबंधात्मक कारवाई देखील त्याच्यात कोणत्याही स्वरूपाची सुधारणा झालेली नाही. त्यामुळे जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी स्थानबद्ध करण्याबाबत अहवाल जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या विभागात पाठविला.

त्यानुसार आलेले दोन्ही प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेने जिल्हाधिकारी यांच्या कार्यात रवाना केला. त्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दोन्ही गुन्हेगारांवर स्थानबध्दतेची कारवाई करण्याच्या आदेशाला मंजूरी दिली आहे. यातील गुन्हेगार रमण उर्फ माकू बापू नामदास याला ताब्यात घेऊन कोल्हापूर येथे स्थानबद्ध करण्यात आले तर जामनेर येथील गुन्हेगार योगेश उर्फ भुऱ्या वसंत चव्हाण याला ताब्यात घेऊन ठाणे जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी मंगळवारी ३० जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.