⁠ 
शनिवार, मे 18, 2024

जो चोरी करतो त्यांची ईडी लागते ; आशीष शेलारांचा खडसेंवर टोला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ ऑगस्ट २०२१ । भाजपचे माजी नेते आमदार आशीष शेलार खान्देश दौऱ्यावर असून ते आज दुपारी जळगावात आले आहे. दरम्यान, यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत शेलार यांनी नाव न घेता भाजप सोडून राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

ज्यांनी ज्यांनी भाजप सोडला त्यांची दुर्गती झाली. याची प्रचिती आगामी काळात येईलच असं म्हणत जो चोरी करतो त्यांची ईडी लागते अशा शब्दात आशीष शेलार यांनी खडसेंवर टीका केली. या पत्रकार परिषदेला यावेळी आमदार राजूमामा भोळे, भाजपा महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, राधेश्याम चौधरी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील आदिंची उपस्थिती होती.

जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने सुमारे दहा हजार हेक्टरवर दुबार पेरणी करावी लागली आहे. सरकारी यंत्रणेने ही आकडेवारी लपवून सरकारचे खान्देशाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.  या भागात सरासरी इतका पाऊस देखील पडलेला नाही. यामुळे राज्य सरकारने कोणतीही पूर्वतयारी केल्याचे दिसून येत नाही. यामुळे केवळ घोषणा आणि फक्त सरकारकडे बोट दाखविण्याचे काम करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हे माणसे जगवणारांचे नसून मृत्यू पडलेल्यांचे आकडे जाहीर करणारे सरकार आहे.

यावेळी एकनाथराव खडसे यांच्याबाबत प्रश्‍न विचारला असता ते म्हणाले की, हा विषय आता जुना झाला आहे. आपण खडसे यांच्यावर वैयक्तीक टीका करणार नाही. तथापि, ज्यांनी भाजप सोडला त्यांची दुर्गती झाली आहे. येत्या निवडणुकांमध्ये दुध का दुध पानी का पानी होणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला. तर चोरी करणार्‍यांच्याच मागे ईडी लागते असा टोला देखील आशीष शेलार यांनी मारला.