मुक्ताईनगरात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई; लाखोंचा मुद्देमालासह तिघे ताब्यात

एप्रिल 11, 2026 5:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर परिसरात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध नाशिकच्या ‘अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स’ने (ANTF) मोठी कारवाई केली आहे. बोहार्डी फाट्याजवळ सापळा रचून पोलिसांनी सुमारे २२ किलो १७० ग्रॅम गांजा जप्त केला असून, याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2 jpg webp

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, नाशिक कृती विभागाने मुक्ताईनगर ते वरणगाव दरम्यान असलेल्या महामार्ग क्रमांक ५३ वर पाळत ठेवली होती. बोहार्डी फाट्याजवळ संशयास्पद हालचाली दिसताच पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी सुमारे २२ किलो १७० ग्रॅम वजनाचा गांजासदृष्य अंमली पदार्थ जप्त केला असून त्याची किंमत अंदाजे २ लाख २१ हजार ७०० रुपये आहे.

हा माल पांढऱ्या रंगाच्या गोणीत भरलेला होता. तसेच आरोपींकडून कार (क्र. सीजी ०४ केए २९००) आणि मोटारसायकल (क्र. एमएच १९ डीएल ६४१३) जप्त करण्यात आली आहे. एकूण ३ लाख १ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस हवालदार कालीचरण बिऱ्हाडे (क्य ४९), अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, नाशिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रविंद्र उमराव बेलदार (रा. धाबे पिंप्री, ता. मुक्ताईनगर), चैनसिंग उमराव चव्हाण (पत्ता अज्ञात) व एकनाथ (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. प्रकाश पवार, एएनटीएफ कृती विभाग, नाशिक हे करत असून प्रकरण त्यांच्याकडे वर्ग केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now