कारमधून अवैध गुटख्याची तस्करी, पोलिसांनी केला पावणे दोन लाखाचा माल जप्त

नोव्हेंबर 4, 2023 2:34 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२३ । भुसावळ शहर पोलिसांनी तापी पुलावर अवैधरित्या गुटखा घेऊन जाणाऱ्या वाहनावर कारवाई केली. या कारवाईमध्ये सुमारे १ लाख ७४ हजार ३१४ किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून याबाबत भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

gutka jpg webp

नेमका काय आहे प्रकार
एक तरुण हा नॅनो कारमध्ये राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, तंबाखू आणि पानमसाला घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने गुरुवारी रात्री कारवाई करत भुसावळ जवळील तापी नदीच्या पुलाजवळ नॅनो कार क्रमांक (एमएच १२ जेझेड ६७१६) ही कार अडविली. यात कारचालक किशोर राजकुमार आगीचा रा. सिंधी कॉलनी, भुसावळ याची चौकशी केली असता कारमध्ये अवैधरित्या गुटखा व पानमसाला घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान पोलिसांनी १ लाख ७४ हजार ३१४ किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. शुक्रवारी ३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता पोलीस कॉन्स्टेबल राहुल भोई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी किशोर राजकुमार आगीच्या याच्या विरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now