⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | गुन्हे | नशेचे औषध विक्री करणाऱ्या मेडिकलवर कारवाई

नशेचे औषध विक्री करणाऱ्या मेडिकलवर कारवाई

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज। २६ जुलै २०२३। अमळनेर शहरातील राजमुद्रा मेडिकल येथे नशा करण्यासाठी लागणारे औषध विक्री केल्या जात होत्या. त्या बद्दल अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कारवाई दुकानावर कारवाई केली आहे. तसेच विक्रीसाठी आणलेले औषधी देखील जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी मंगळवार २५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर शहरातील नगरपरिषदेच्या मालकीचे हाशीमजी प्रेमजी शॉपिंग सेंटरमधील राजमुद्रा मेडिकल नावाचे दुकान आहे. या दुकानात मानवी शरीरास घातक ठरणाऱ्या आणि नशेसाठी वापरण्यात येणारे औषधी विक्री होत असल्याची गोपनीय माहिती जळगाव येथील अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली. त्यानुसार औषध निरीक्षक सोमनाथ मुळे यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी १९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता छापा टाकून कारवाई केली. यावेळी दुकानात विक्रीसाठी ठेवलेले औषधी जप्त केले आहे.

याप्रकरणी दुकानदार सुजय अधिकार पाटील रा. शिरपूर रोड अमळनेर आणि अनोळखी एक जण अशा दोघांवर मंगळवारी २५ जुलै रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह