raver news-जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२२ । रावेर शहरात विविध ठिकाणी आकोडे टाकून वीज चोरी करणार्या वीज चोरट्यांविरोधात वीज कंपनीने मोहिम उघडल्याने खळबळ उडाली आहे.

रावेर शहरातील जुना सावदा रोड, मदिना कॉलनी, स्टेशन रोड परीसरात आकोडे टाकून वीज चोरी होत असल्याने वीज कंपनीचे मोठे नुकसान होते होते. वीज कंपनीने या भागात शुक्रवारी 50 जणांविरोधात कारवाई करीत संबंधित दंडात्मक रकमेची बिले देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

ही कारवाई महावितरणचे उप कार्यकारी अभियंता अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंता दिलीप सुनराणी, सहायक अभियंता समीर तडवी, वायरमन संतोष जाधव, गणेश दहिभात, श्रीकृष्ण बोरकुल इत्यादी आदींच्या पथकाने केली.












