⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

जळगाव विभागातील ३१ एसटी कर्मचाऱ्यांवर पुन्हा बडतर्फिची कारवाई

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ फेब्रुवारी २०२२ । महामंडळातर्फे संपातील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाईसह आता बडतर्फीचीही कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी पुन्हा विविध आगारांतील तब्बल ३१ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली असून, आतापर्यंत जळगाव विभागातील १७२ कर्मचाऱ्यांवर ही कारवाई झाली आहे.

विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला आता तीन महिने पूर्ण होत आहेत. महामंडळाने वेतनवाढ देऊनही हे कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. यामुळे महामंडळाची ८० टक्के सेवा बंद आहे. सेवा बंदमुळे महामंडळाचे कोट्यवधींचे नुकसान होत असल्यामुळे महामंडळाने संपातील कर्मचाऱ्यांवर निलंबनासह बडतर्फीची कारवाई सुरू केली आहे. सुरुवातीला निलंबन करून नंतर बडतर्फीची कारवाई करण्यात येत आहे.

या आगारातील कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारवाई

बुधवारी ३१ कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईत चाळीसगाव आगाराचे सर्वाधिक १६ कर्मचारी असून, यावलचे आठ तर चोपड्याचे ७ कर्मचारी आहेत. दरम्यान, बडतर्फीसोबत आतापर्यंत ४०१ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे महामंडळातर्फे सांगण्यात आले.

हे देखील वाचा :