Jalgaon : पोलिसांना गुंगारा देत न्यायालयाच्या आवारातून पलायन केलेल्या भोलाला अटक

जून 13, 2024 4:19 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२४ । भंगार विक्रेत्याला मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या भोलासिंग जगदीशसिंग बावरी (वय ३२, रा.तांबापुरा, जळगाव) याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र पोलिसांना गुंगारा देत न्यायालयाच्या आवारातून भोलासिंगने पलायन केल्याची घटना बुधवारी १२ जूनला घडली होती. अखेर आज पहाटे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून अटक केली. त्याला पुढील कार्यवाहीसाठी शनिपेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

d1 jpg webp

भोलासिंग जगदीशसिंग बावरी या आरोपीला शनिपेठ पोलिसांनी एका भंगार विक्रेत्याला मारहाण केल्याप्रकरणी अटक केली होती. भोलासिंग हा अट्टल गुन्हेगार आहे. ४ ते ५ दिवसापूर्वी तुरुंगातून सुटून बाहेर आलेला आहे. त्यानंतर त्याने पुन्हा मारहाणीचा प्रकार केल्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती. दरम्यान न्यायालयात त्याला हजर केल्यावर न्यायालयीन कोठडी मिळाली होती.

शनीपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी बोरसे व वानखेडे हे त्याला पुढील कार्यवाहीसाठी घेऊन जात असताना न्यायालयाच्या आवारातूनच बुधवारी भोलासिंग बावरी याने पलायन केले होते. याप्रकरणी शनीपेठ पोलीस स्टेशनला लांच्छन लागले होते. दरम्यान गुरुवारी दि. १३ जून रोजी रात्री ३ वाजेच्या सुमारास दिवसभर लपून बसलेला भोलासिंग बावरी हा लपत छपत सिंधी कॉलनी परिसरातून तांबापुराकडे घरी जात होता. त्यावेळेला गस्तीवर असणाऱ्या पोलिसांची नजर त्याच्यावर पडली.

त्यांनी त्याचा पाठलाग करीत त्याला ताब्यात घेतले. सिंधी कॉलनी येथील भक्त निवास येथे तो लपून बसला असल्याची माहिती मिळाली. दरम्यान पोलिसांनी त्याला पकडून आणल्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशनला पुढील कारवाई केली.दरम्यान भोलासिंग बावरी याला अटक झाल्यामुळे शनिपेठ पोलीस स्टेशनने सुटकेचा निश्वास टाकला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now