भुसावळच्या जबरी चोरीतील आरोपी जळगाव पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२२ । भुसावळच्या जबरी चोरीतील पसार आरोपीला एमआयडीसी पोलिसांचे शोध पथकांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपासाकामी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

भुसावळ लोहमार्ग पोलिसात जबरी चोरीच्या दाखल गुन्ह्यातील पसार आरोपी पोहेकॉ दिवानसिंग राजपूत यांना जळगाव येथील सुप्रीम कॉलनीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांचे शोध पथक आनंदसिंग धर्मा पाटील. पोना विकास सातदिवे, मुकेश पाटील, गणेश शिरसाडे व भुसावळ लोहमार्ग पॉस्टे अजित तडवी, पोहेकॉ दिवानसिंग राजपूत यांनी आज रोजी दुपारी २.०० वाजता सुप्रीम कॉलनीत चापडा रचून आरोपी अशोक उर्फ अशक्य सदाशिव कोळी ( वय २६,रा. सुप्रीम कॉलनी जळगाव) यास ताब्यात घेतले. पुढील तपासाकामी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.