Accident : दुचाकीला कारची जोरदार धडक, एक ठार, एक जखमी

ऑगस्ट 11, 2022 4:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२२ । दिपनगर येथील मेक्सो कंपनीत सुरक्षारक्षक म्हूणन असलेले रविंद्र सुकदेव इंगळे यांच्या दुचाकीला स्विफ्ट कारने जोरदार धडक दिली. या अपघातात इंगळे हे ठार झाले आणि एक जखमी झाल्याची घटना तळवेलजवळ काल रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

accident 1

भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील रहिवाशी व दिपनगर येथील मेक्सो कंपनीत सुरक्षारक्षक असलेले रविंद्र सुकदेव इंगळे (वय ५२) व पवन ढमढेरे हे दोघे विज केंद्रातून आपले कर्तव्य आटोपून मोटर सायकल (क्र.एम.एच. १९ सी. एम. ८५६२) वरून तळवेल येथे घरी परत होते. गावाजवळ वळण घेत असताना मुक्ताईनगरकडून येणारी भरधाव स्विफ्ट कार (क्र. एम. एच. १९ सी. वाय. ६४९६) ने मोटर सायकला जोरदार धडक दिली.

दरम्यान, मोटर सायकल स्वार रविंद्र इंगळे हे जागीच ठार झाले तर बस बसलेले पवन ढमढेरे हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत रविंद्र सुकदेव इंगळे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. याबाबत वरणगाव पोलीसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now