उभ्या ट्रकवर क्रूझर धडकली ; बोदवडच्या दोन मुलांचा मृत्यू, १४ जण जखमी

जून 10, 2025 9:10 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२५ । अहमदनगर-संभाजीनगर महामार्गावर नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला शिवारात उभ्या ट्रकवर क्रूझर वाहन मागून धडकले व घासत गेल्याने भीषण अपघात झाला. यात बोदवडच्या क्रिकेट अकादमीतील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर इतर १४ जण जखमी झाले. प्रथमेश योगेश तेली (वय १४, रा. जामखी दरवाजा, बोदवड) आणि वृषभ बबन सोनवणे (वय १६, रा. बोदवड) असं मृत विद्यार्थ्यांची नावे असून या घटनेबाबत नेवासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

acd

बोदवड तालुक्यातील केसरी स्पोर्ट ॲकॅडमीच्या १३ क्रिकेट खेळाडूंच्या क्रुझर वाहनाला अहमदनगर-संभाजीनगर महामार्गावर नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला शिवारात आज, सोमवारी पहाटे सव्वा पाच वाजता भीषण अपघात झाला. पुण्याहून क्रिकेट सामना पाहून परत येत असताना हा अपघात झाला, ज्यात दोन खेळाडूंचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, १४ जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अधिक माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील केसरी स्पोर्ट अकॅडमीचे १३ खेळाडू पुण्यातील गहुंजे येथे एमपीएल क्रिकेट सामना पाहण्यासाठी गेले होते. सामना आटोपल्यानंतर ते क्रुझर वाहन क्रमांक (एमएच २० डीजे ४८३४) ने बोदवडकडे परतत होते. पहाटे ५ वाजून १५ मिनिटांनी उस्थळ दुमाला गावाच्या हद्दीत त्यांच्या क्रुझर वाहनाला मागून येणाऱ्या एका ट्रकने जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात प्रथमेश तेली याचा जागीच मृत्यू झाला, तर वृषभ सोनवणे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोबत असलेले अन्य ११ जखमी खेळाडू नेवासा फाटा येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रुग्णवाहिकेच्या साहाय्याने जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे बोदवड तालुक्यात शोककळा पसरली आहे. या घटनेबाबत नेवासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment