Accident : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दोघे दुचाकीस्वार मित्र..

सप्टेंबर 26, 2022 5:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२२ । भरधाव ट्रकने जळगावातील दोघा मित्रांच्या दुचाकीला जबर धडक दिल्याने दोघे मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणी रविवारी अज्ञात ट्रक चालकाविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

accident 34 jpg webp

जळगावच्या सिंधी कॉलनीतील अक्षय वासुदेव कुकरेजा (वय २४) व अमित पाहुजा हे दुचाकीने शनिवार, २४ सप्टेंबर रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास नशिराबाद-जळगाव या रस्त्याने येत असताना तरसोद फाट्याजवळ टायर कंपनीच्या गोडावून समोर जळगावकडून येणार्‍या ट्रकने अक्षय कुकरेजा याच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार अक्षय व दुचाकीवर मागे बसलेला त्याचा मित्र अमित पाहुजा हे दोन्ही रस्त्यावर फेकले जावून गंभीर जखमी झाले.

घटनेत अमित पाहुजा याचा मोबाईल फुटून त्याचे नुकसान झाले. याप्रकरणी दुचाकीस्वार अक्षय कुकरेचा याच्या तक्रारीवरुन रविवारी अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल अतुल महाजन करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now