Accident : भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

एप्रिल 29, 2022 2:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२ । भडगाव शहरातील पाचोरा चौफुलीवर भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

aaccident

अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील पहूर येथील राहणारे विलास बाबुलाल चौधरी (वय-४५) हे कामाच्या निमित्ताने भडगाव शहरातील पाचोरा चौकात २१ एप्रिल रोजी रात्री १० वाजता आले होते. रात्री रस्त्यावर वाहनाची वाट पाहत असतांना त्यावेळी ट्रॅक्टर क्रमांक (एमएच २० सीटी ८०९८) ने जोरदार धडक दिली. या धडकेत विलास चौधरी हे जागीच ठार झाले. अपघात घडल्यानंतर ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टर घेवून पसार झाला होता. याप्रकरणी मयताची पत्नी विजया विलास चौधरी यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाहेकॉ विजय जाधव करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now