जळगाव लाईव्ह न्यूज । १८ फेब्रुवारी २०२२ । तरसोद-फागणे बायपासवर ७ फेब्रुवारीला आव्हाणे येथे खड्ड्यात पडून जबर जखमी झालेल्या नांद्रा येथील युवकाच्या कुटुंबीयांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कंत्राटदाराने ५० हजार रुपयांची मदत दिली आहे. त्याचप्रमाणे त्याच्या उपचाराचा खर्च करण्याचेही आश्वासन दिले.

नांद्रा येथील नरेंद्र सोनवणे या युवकाचा अपघात झालेला आहे. त्या युवकावर रुग्णालयावर उपचार सुरू असून मृत्यूशी झुंज देत आहे. राष्ट्रीय महामार्ग तरसोद-पाळधी बायपास दरम्यान आव्हाणे शिवारात मोठा खड्डा पडलेला असून, त्याभोवती मातीचे ढीग लावण्यात आलेले आहेत. नांद्रा बुद्रुक येथील खड्ड्यात पडून जखमी झालेल्या युवकाची प्रकृती चिंताजनक असून कंत्राटदाराने त्याला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य ऍड. हर्षल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका तक्रार अर्जाद्वारे केली होती. त्या अनुषंगाने खासदार उन्मेष पाटील यांनीही दखल घेतली. अपघातग्रस्त युवकाला मदत करावी, अशी सूचना त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सी.एम. सिन्हा यांना दिली. पाठपुरावा केल्यानंतर बुधवारी कंत्राटदार कंपनीचे अधिकारी मित्तल यांनी सोनवणे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांना ५० हजारांची मदत दिली.

- जळगाव जिल्ह्याची पाण्याची चिंता संपणार? गिरणा धरण शंभरीच्या उंबरठ्यावर!
- पुणे यार्डातील तांत्रिक कामामुळे भुसावळ, जळगावमार्गे धावणाऱ्या ‘या’ रेल्वे गाड्यांच्या सेवेत मोठा बदल
- पावसाचा हायअलर्ट ! जळगावसह अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा
- जळगाव जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत पावसाचा ‘येलो अलर्ट’; हवामान खात्याचा इशारा
- रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभ







