Accident : मुक्ताईनगरजवळ विचित्र अपघात, ५ जण जागीच ठार, पाठलाग करून ट्रक चालकाला पकडले

मे 13, 2022 10:29 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२२ । राज्यासह जळगाव जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. अशात आज पहाटे मुक्ताईनगर तालुक्यात विचित्र भीषण अपघात झाला आहे. मुक्ताईनगरच्या घोडसगावाजवळ बंद पडलेल्या टँकरमधून दुसर्‍या टँकरमध्ये दुध टाकत असताना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने हे टँकर्स आणि क्रेनला धडक दिली. या भीषण अपघातामध्ये ५ जण जागीच ठार झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

muktainagar accident five

काय आहे घटना?
महामार्ग ६ वरील मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव नजीक धुळ्याहून दूध घेऊन चाललेला टँकर अचानक बंद पडला. यामुळे टँकरच्या मालकाने दुसरा टँकर बोलावून यात दूध शिफ्ट करण्याचे काम सुरू केले. यासाठी एक क्रेन देखील बोलावण्यात आली. यानुसार दुध हलविण्याचे काम सुरू असतांना समोरून भरधाव वेगाने आलेल्या टाईल्सने भरलेल्या ट्रकने दोन्ही टँकर्स आणि क्रेनला धडक दिली. यात बंद पडलेल्या टँकरमधील तीन जण, टँकरचा धुळ्यावरून आलेला मालक आणि अजून एक जण अशा पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातात 4 जण धुळे जिल्ह्यातील मयत झाले आहेत. तर 1 जण जळगावमधील मयत झाला आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून अपघात कशामुळे झाला याची पोलिस चौकशी करीत आहेत.

अपघातातील मृतांची नावं
अपघातातील मृतांची नावं पवन सुदाम चौधरी, वय 25 धनराज बन्सीलाल पाटील, वय 48 धनराज सुरेश सोनार, वय 37 उमेश राजेंद्र सोळंके, वय 35 भालचंद्र गुलाब पाटील, वय 31 अशी आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now